डायरी

अडगडीच्या खोलीचा दरवाजा काही कामाकरिता आज उघडण्यात आला. हवेच्या झुळूकीने जुन्या डायरीचे काही पान अचानकच उलटले. त्या पानावरील शब्द कानात गर्दी करत होते.कीतीतरी दीवसानंतर ती डायरी आज उघडली होती.त्यावरील शब्दांना बाहेर पडायची बरीच घाई होती.शेवटी त्या शब्दांची हाक कोणीतरी ऐकली होती आणि त्या खोलीत पडलेली डायरी उघडली होती.शब्दांची ती घुसमट मला जाणवत होती. भुतकाळातील बरयाच गोष्टीची आठवण होत होती. काही गोष्टींमुळे हसायला देखील आलं पण काय माहीती का डोळ्यातुन पाणी पडलं.रडलेल्या गोष्टींवर हसु आलं आणि हसलेल्या गोष्टींवर डोळ्यात पाणी….आयुष्यात समोर चालत असताना देखील त्या डायरीतील शब्दानी बरचं मागे खेचल.कीतीतरी आठवणी दडल्या होत्या त्या डायरीत त्याची पुन्हा एकदा पुनरावृत्ति झाली…ते दीवस पुन्हा एकदा जगायचे होते,परत त्याच आठवणीत रमायचे होते.पण आता बरचं काही बदलेल होत.तरी सुद्धा मन जास्तच खुश होतं.शाळेतील आठवणी जमा करुन पुन्हा काॅलेजमध्ये तेच करायचं होत. काही आठवणी जपुन ठेवायच्या होत्या तर काही विसरायच्या देखील होत्या.दीवसामागुन दीवस जात होते आणि डायरीतील पान आपोआपच उलटत होते.जणू सगळ्या गोष्टी परत जगत आहो अंस वाटायला लागलं.लहान लहान शब्द बरचं काही सांगुन गेले. जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि हवेची ती झूळूक नाहीशी झाली. जुन्या गोष्टीना पूर्णविराम मिळाला आणि आयुष्यातील नविन डायरी पुन्हा सुरु झाली.

Practical जग

जुने दीवस गेलेत आणि हळूहळू नविन दीवस येऊ लागले.हळूहळू सगळं काही बदलायला सुरुवात झाली. मीठापासुन चन्याच्या दाळीपर्यत सगळ्यांचे भाव महागले एवढच नाहीतर लोकांचे भाव देखील वाढले. हे इतक्यातच थांबल नाही तर पुढे नवनवीन शोध लागले. तंत्रज्ञानाचा शोध हा एक मोठा आणि महत्वाचा शोध देखील याच काळात लागला. जग देखील practical व्हायला लागलं.दुरुन लोक फोनवर बोलु लागलेत म्हणून एकमेकांना भेटण्याचं प्रमाण कमी झालं. आवाजचं अंतर कमी झालं असलं तरी मनाचं अंतर मात्र वाढत होतं.सगळ्याच गोष्टी लोकांना सोप्या वाटू लागल्या. मग ते कधी दुरच्या लोकांसोबत बोलण असो कींवा नाती जुळवन असो, सगळं काही झटक्यात व्हायला लागलं. काही दीवस उलटले नाहीतर विविध sms चे अॅप आलेत . यावर तर काय म्हणे टाईपच कराव लागते, म्हणजे फोनच बिल आणि बोलण्याचा त्रास देखील वाचला. जिभेची वाफ करण्याचं काही कामचं उरल नाही.टाईप करुन हात दुखायला लागले म्हणून मग एक sms घ्यायचा काॅपी करुन पेस्ट करायचा मग काय हाताच दुखन देखील कमी झालं. काॅपी पेस्ट केल्याने मेमरी फूल झाली. म्हणून मग डीलीट च्या बटनाचा शोध लागला.डीलीट केल की सगळं नाहीस व्हायच. कधीतरी महत्वाच काही डिलीट झालं की मग undo करायचं. लोकांना या सगळ्या गोष्टीची सवय झाली होती मग लोक या गोष्टीचाउपयोग आपल्या आयुष्यात करायला लागले. एका झटक्यात लोक नाती जोडायची आणि दुसर्याच क्षणाला ती डीलीट करता येत याच देखील विचार करायचे. पण त्यांना तरी कुठे माहीती होत की नात डीलीट केल्याने ते तोडता येऊ शकत पण undo केल्याने परत मिळवता येत नाही. Type केलेल डिलीट करता येत पण बोललेल्या गोष्टी मात्र समोरच्याचा मनातुन मिटवता येत नाही. computer la कमांड परत देता येते आणि आधीची cancel देखील होते पण तोंडातून निघालेली कमांड मात्र cancel होत नाही. sms काॅपी पेस्ट करणं सोप असलं तरी आयुष्यातील कोणत्याच परिक्षेत काॅपी पेस्ट नाही हो करता येत.इथे सगळे उत्तरे Type च करावी लागतात, ते सुद्धा न चुकता… कारण चूकलेल मिटवणार डीलीट च बटन आयुष्याचा कीबोर्ड ला कधी नव्हतच.खरया् आयुष्यात कीतीही चुका झाल्या तरी मात्र समोर जावच लागतं कारण इथे backspace च option नसतं. अस हे जग Practical practical करत नसणार्या गोष्टींमध्ये अडकून पडतं. तंत्रज्ञानाला हे सगळं सहजरीत्या करता येत पण आपल्याला नाही कारण आपल्याला एक सुंदर मन देवाने दील आहे .त्याचा वापर करुन या सगळ्या गोष्टी आपण चूटकीसरशी सांभाळू शकतो, म्हणूनच मित्रांनो आयुष्यात practical पणे जगा पण आयुष्याला practical समजू नका.

अमीर बनना – एक सपना

उलझा उलझा सा हैं ऐ हौसला

बिखरा हुआ हैं एक सपना

न जाने क्यों लोग अमिरी के पीछे पढे है

उम्र कटती गई ख्वाबों में और अमिरी रह गई सिर्फ बातों में

खुशी के पन्ने शायद गुम हो गए

उम्र कट गई और अमिरी और खुशी सिर्फ नाम रह गए

दोनो का एकदूसरे से न कोई वास्ता था और

लोगों का अमिरी मतलब खुशी यहीं मानना था

जज़्बात और रीश्ते अमीर को कहा पता थे

खुशी के तो शायद यही दो हकदार थे

अमीर बनने में जिंदगी बित गई

जिंदगी खतम हो गई और खुशी की चाबी गुम हो गई

पहले खुशी को ठुकराकर अमीर बनना चाहा

अब अमीरी साथ लेकर हम खुशी ढूढने निकल पडे…..

श्रीदेवीजी यांना भावपूर्ण श्रधांजली….

आज दिनांक २५फेब्रुवरी २०१८ सकाळी उठल्यावर लगेच टीव्ही च बटन दाबलं.थोड्या बातम्या एकाव्या म्हणून बातम्याचं चॅनेल लावलं आणि एक धक्कादायकच बातमी समोर आली. “सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांच निधन” डोळ्यांवर विश्वास बसला नाही म्हणुन लगेच दुसरं चॅनल लावलं त्यावर पण हीच बातमी…लहानपणी जेव्हा अभिनेता अभिनेत्री म्हणजे काय? हे कळत नसताना ऐकललं नाव म्हणजे श्रीदेवी….अभिनेत्री म्हटल्यावर आईबाबांच्या ओठांवर येणार हे एकमेव नाव….लहानपणापासन एकलेलं नाव आज अचानकच मनाला धक्का देउन गेलं.चित्रपट म्हणजे काय? हे देखील माहीती नव्हतं मग अभिनेत्री म्हणजे काय हा प्रश्नच उदभवत नाही ….चित्रपट कधी बघितला नसतानाही श्रीदेवी म्हटलं की सगळी सिनेमासृष्टीची ओळख व्हायची. आकाशात लखलखणारी ही चांदनी अचानककच गायब व्हावी आणि सगळीकडे काळोख पसरावा अशीच ही परिस्थिती होती.निधन झाल्यावर खरचं आयुष्य संपत असतं का? हा प्रश्न आज पुन्हा मनाला विचारावा वाटला. मनाने खुप सुंदर उत्तर दीले.” एखाद्या व्यक्तिच निधन तेव्हाच होते जेव्हा त्या व्यक्तिची ओळख पुर्णपणे पुसल्या जाते.पण पुसल्या त्याच गोष्ठी जातात ज्या वरवर लिहल्या असतात पण ज्या गोष्टी मनावर कोरल्या असतात त्या पुसण अशक्यच असत.ती व्यक्ति निधनानंतर देखील लाखो लोकांच्या मनात मात्र जीवंत असते….

अशाच अभिनेत्री श्रीदेवीजी याना भावपूर्ण श्रधांजली….

हा टप्पाही येतोच…..

सगळं काही सुरळीत चालू असताना एखाद संकट अचानकच येत. जे होत ते चांगल्यासाठीच म्हणत विसरण्याचा प्रयत्न देखील आपण करतो पण सगळ्या गोष्टी आयुष्यात विसरता येतातच अस नाही. झालेल्या सगळ्या गोष्टी विसरण एवढ सोप असत तर भुतकाळ नावाची गोष्टच राहली नसती. आणि आठवणींची कींमत शुन्यच झाली असती.मागे गेलेल्या गोष्टीना मागेच ठेऊ आणि पुढे जाऊ अस कीत्येकदा म्हटल पण तरीही मागे पाहील्याशिवाय समोरच पाउल टाकता येइना . या टप्पयात खरच सगळं काही हरवल्यासारख वाटत. विचार करायचं म्हटलं तरी जास्त विचार केल्याने शेवटी नैराश्यच पदरी पडतं. आणि परत तेच विचार मनात गर्दी करायला लागतात.

स्वप्न …..

एक असही स्वप्न असावं
बगिच्यापेक्षा शेतातूनच कधीतरी फीराव….
एक असही स्वप्न असावं
चारचाकी पेक्षा बैलगाडीतुन एकदातरी फीराव….
एक असही स्वप्न असावं
स्विमींगपूल पेक्षा गावाकडच्या नदीत कधीतरी पोहाव….
एक असही स्वप्न असावं
बेड टी घेण्यापेक्षा कधीतरी चूलीजवळ येउन बसावं…
एक असही स्वप्न असावं
मोबाईल मधल्या गाण्यापेक्षा कधीतरी आजीच्या गोष्टीतच रमून जावं…
एक असही स्वप्न असावं
मोठ होउन जगण्यापेक्षा कधीतरी लहान होउन जगावं…
एक असही स्वप्न असावं

दोन थेंब

आज अचानक दोन थेंब अलगदच हातावर पडले आणि माझ्याच मनाशी संवाद घालू लागले.थोडा वेळासाठी तो मला वादच वाटला. तो वाद की संवाद याची सांगड घालताना ते बोलू लागले.”स्वताला खुप धीट समजत होतास ना! मुलं कधीच रडत नाहीत अस ठामपणे सांगणारा तु! आज तुझ्यादेखील डोळ्यात पाणी आले. ते आंनदाश्रु असतील तरीही आज बहीण सासरी जाताना पाहुन मन नाराज होणारच.आतापर्यत तीलाच चिडवत होतास ना! मग आज अचानक तीचे गुण कसा काय गायला लागलास? नेहमी बाबांना तीच लग्न करुन द्या म्हणायचा न! मग आज का तुझा जीव एवढा कासाविस होतोय? कारण..तुला देखील काळजी होतीच की तीची…वागण्यात ते दीसत नव्हत पण मनात खुप काही लपलं होत.आता शेवटी तीच लग्न होणार आणि मी गंमत म्हणुन बाबांना सांगितलेली गोष्ट सत्यात उतरणार हे जाणवल्यावर शेवटी तु देखील हळवा झालास.तुझे डोळे अचानकच सगळं काही बोलायला लागलेत.आजपर्यत कधीही ओठांवर न आलेले बोल डोळ्यांनी मात्र सांगितले.अशाच असतात या मुली…जन्माला येताच सगळ्यांच्या मनावर राज्य करतात पण मग मात्र अक्ख घर डोक्यावर घेतात. हळूहळू घरातील रांगोळीपासुन ते माणसांपर्यत सर्वाना तीची सवय व्हायला लागते.बहीण जरा मोठी झाली हे पाहुन तु लहानपणीच समजदार व्हायला लागला. कीलबिल करणारी मुलगी जेव्हा शांत होते. तेव्हा कदाचित ती मोठी झालेली असते आणि तीच्या लग्नाची वेळ जवळ यायला लागते.आपल्या बागेतील फुलपाखरु आता रोज आपल्याला दीसणार नाही. कदाचित म्हणूनच आज तुझे डोळे देखील पाणावलेत.या मूली असतातच एवढ्या गोड ….देवाने मुलींना पाठवल्यावर तो देखील रडला असावा. कदाचित म्हणूनच आधी भरपूर पाऊस पडायचा पण आता मात्र हळूहळू मुलींच आणि पाऊसाच दोघांचही प्रमाण कमी होताना दीसतय.” एवढ बोलुन अश्रुंचे ते दोन थेंब नाहीसे झालेत.